...तर शिवसेना उतरणार रस्त्यावर -बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:05 IST2017-12-19T00:05:04+5:302017-12-19T00:05:11+5:30
तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.

...तर शिवसेना उतरणार रस्त्यावर -बांगर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.
आंबाळा येथील सदर शेतकºयाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने त्याची रक्कम मिळण्यासाठी तहसीलचे खेटे घेतले. मात्र रक्कम मिळत नसल्याने त्याने नाईलाजास्तव आत्महत्या केली. यात तहसीलदार व संबंधित लिपिकाची दिरंगाई असल्याचा आरोप मयताच्या पत्नी, आईने केला आहे. तर मुलाबाळांसह त्यांचे उपोषण सुरू आहे.
या ठिकाणी भेट देवून संतोष बांगर यांनी प्रशासन दखल घेणार नसेल तर शिवसेना रास्ता रोको करेल, असा इशारा दिला. या ठिकाणी माजी जि.प.सदस्य बाबा नाईक यांनीही भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात काहीच प्रक्रिया झाल्याचे दिसत नव्हते.
टाकळीच्या शेतकºयांचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर
हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करीत आहेत. शेतकरी संघटनेचे मुंजाराव बेंगाळ व इतरांचा यात समावेश आहे. पीककर्जाची रक्कम बचत खात्यात टाकण्यात आली नसून स्टेट बँक आॅफ इंडियाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा त्यांचा आरोप होता. या शेतकºयांची समस्या ऐकून घेत बांगर यांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांनाही आधी संबंधितांनी शेतकºयांप्रमाणेच उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिक आपल्या स्टाईलवर आले की, या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले.