शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

By विजय पाटील | Updated: April 1, 2024 14:17 IST

महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली : भाजपनेच मागील काही दिवसांपासून चर्चेचा रतीब लावत शिंदे गटाची जागा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देवून भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. उमेदवारीचे हे नाट्य मात्र भाजपच्या तीन आमदारांना जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोलीतील भाजपचे नेते जेमतेम पाचशे कार्यकर्ते जमा करून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना प्रचंड विरोध असल्याचे दाखविण्यात यशस्वी ठरले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उघड भूमिका घेवून राजीनामा दिल्याने ते भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. त्यामुळे आधीच त्यांच्या नावाला विरोध केला जात होता. मात्र तो डावलून मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या स्थानिक मंडळीने पाटील यांना विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदला अथवा आम्हाला उमेदवारी द्या, अशी भूमिका घेतली होती. 

शिंदे गटाकडे दुसरा तेवढा सक्षम उमेदवार दिसत नसल्याने त्याांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झाले उलटच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नीसाठी यवतमाळमधील जागा देवू करीत हदगाव विधानसभेत मागच्या वेळी अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाबूराव कदम यांना पुढे केले. कदम यांच्यामुळेच आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मानहानीकारक पराभव पत्करण्याची नामुष्की आली होती. पुन्हा तेच कदम आष्टीकरांच्या पुढ्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मंडळींनाही आता उमेदवार बदलला तर नेटाने काम करून भाजपचे म्हणने खरे होते, हे पटवून द्यावे लागणार आहे. जर कदम यांना दगाफटका झाला तर आ.तान्हाजी मुटकुळे, आ.नामदेव ससाणे व आ.भीमराव केराम यांची पुढची विधानसभेची उमेदवारीच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मंडळीची काम करण्याची इच्छा नसल्याने आधी यांना तंबी द्या, अशी अटच शिंदे गटाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या या नाट्यात हाती काही लागले नसताना तीन आमदारांची विधानसभा मात्र पणाला लागली आहे. भाजपच्या रेट्यापुढे लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो. तर भाजप आपलेच आमदार बाजूला सारून नवे चेहरे देण्यात तसूभरही मागे पाहणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपवरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.उमेदवार बदलल्याचा फायदा त्याशिवाय मात्र घेता येणार नाही.

...तर भाजप आमदारांनाही बसू शकतो फटकाउमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमेरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षांत खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा.पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असे नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा