शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर उपरे नाचतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

"डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय. हे नुसते हवेत थापांच्या वाफा सोडतायत. सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी असं सुरुये. मी मागेही बोललो होतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. भाजपमध्ये जे चाललंय सगळं चाललंय ते म्हणजे सगळं आयाराम," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिगोलीत आयोजित सभेत त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.

मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. अनेक वर्ष आपण युतीत होतो, अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष वाढीसाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल वाटायचं, पण हे राहिले दांड्यापुरते. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर हे उपरे नाचतायत. एवढ्यासाठी भाजप वाढवायला मेहनती केली का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आजही त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांबद्दल दया असल्याचं ते म्हणाले.

अजून किती डबे लागणार?"डबल इंजिन सरकारला आता अजित दादांचा आणखी एक डबा लागलाय. अजून किती डबे लागणार, मालगाडीच होतेय. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करायचं कर्तुत्व नाही का? तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का?" असंही ते म्हणाले.

टरबूजालाही पाणी द्यावं लागतं'एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाHingoliहिंगोली