जनावरे घेवून जाणारा ट्रक शिवसैनिकांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:15 IST2018-01-12T23:15:46+5:302018-01-12T23:15:50+5:30
त्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत.

जनावरे घेवून जाणारा ट्रक शिवसैनिकांनी पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत.
कत्तलखान्याकडे ट्रकमधून जनावरे घेऊन जात असल्याची माहिती सकाळी ११ च्या सुमारास खेरडा संपर्क प्रमुख देवराव गडदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना दिली. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना कळविले. फौजदार मुलगीर यांनी वाहन तपासले असता हा प्रकार आढळून आला. आतमध्ये १७ जनावरे दाटीवाटी कोंडली होती. यावेळी बांगर यांच्यासमवेत राम कदम, कळमनुरीचे शहरप्रमुख संतोष सारडा, जि. प सदस्य फकिरा मुंढे, नगरसेवक सुहास पाटील, नाना नायक, पारवे, दिनकर गंगावणे, एस एम गंगावणे, गजानन भोसले, गजानन सोनुने, ढोणे, राहुल दंतवार, बलराम चौधरी आदी हजर होते. यावेळी बांगर म्हणाले, शिवसेनेच्या वतीने यापूर्वीही हिंगोली, कळमनुरी, औंढा येथील गुरांच्या बाजारात गायींची विक्री करू नये, असे फलक लावले होते. कत्तलीसाठी गुरे नेली जात असल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तरीही तो घेतला जाईल, असा इशारा दिला. तर नंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावला. याप्रकरणी मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊदास रामजी पेकम, अब्दुल कलीम शेख खाजा, अब्दुल अलीम अब्दुल कुरेशी, पांडुरंग केशवराव सातव या तिघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उड्डाणपुल नाही
हिंगोली- शहरालगत असलेल्या खटकाळी बायपास येथे क्रॉसिंगगेट रेल्वे आल्यानंतर बंद केले जाते. उडाणपुल नसल्यामुळे रेल्वे येताच हा गेट दिवसांतून सुरु कमी अन बंद जास्त असतो. त्यामुळे वाहनचालक या ठिकाणी अडकतात. अनेक वाहनचालक थेट पटरी ओलांडतात.