शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिरडच्या सरपंचास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:35 IST

नळाचे कनेक्शन का देत नाही, असे विचारण्यासाठी आलेल्यांनी माझ्या घरात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत साहित्याची नासधूस केल्याची तक्रार शिरडशहापूरच्या सरपंच नंदा ठोंबरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल केली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : नळाचे कनेक्शन का देत नाही, असे विचारण्यासाठी आलेल्यांनी माझ्या घरात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत साहित्याची नासधूस केल्याची तक्रार शिरडशहापूरच्या सरपंच नंदा ठोंबरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. सध्या नळांना ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागात नळ व हातपंप नसल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. वार्ड क्र. २ मधील हातपंप नसल्यामुळे ग्रा.प. सदस्यांनी ठराव घेऊन हातपंपावरून पाईपलाईनद्वारे तात्पुरती उपाययोजना करण्याचे ठरले. पाईपलाईनसुद्धा टाकण्यात आली; परंतु कनेक्शन न केल्यामुळे काम थांबले. काम का थांबवले, असे विचारण्यासाठी काही जण ग्रा.पं. कार्यालयात गेले; परंतु तेथे सरपंच उपस्थित नसल्यामुळे ते सर्वजण सरपंच नंदा ठोंबरे यांच्या घरी गेले. तेथे नळजोडणीबाबत विचारणा केली. परंतु सरपंच म्हणाल्या की, त्या कामाचा ठराव नाही. त्यामुळे कनेक्शन करत नसल्याचे सांगितले. यावरून काहींनी ते जोडण्यासाठी वाद घातला.या घटनेबाबत ठोंबरे यांनी कुरुंदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नळाचे कनेक्शन का देत नाही म्हणून माझ्या घरात घुसून खुर्च्याची नासधूस केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यात शे. गुलाब नबी, रिजवान बेग, शेख नजीब, शेख मुन्ना व इतर १० ते १५ जण असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपींवर कलम १४३, १४७, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह कलम ३(१) (आर)(५) अजाज अप्रका सुधारित कायदा सन २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद करीत आहेत.गुन्हा मागे घेण्याची मागणीऔंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा दाखल केलेले खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी गावातील नागरिकांनी औंढा तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आम्ही त्यांच्या घरी जावून समस्या मांडून निघून गेलो, परंतु सरपंच नंदा ठोंबरे यांनी गावातील काही नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, असे निवेदनात म्हटले यावेळी जि.प.सदस्य श्रीशैल्य स्वामी, माजी उपसभापती जावेद कादरी, साहेबराव शेळके, लक्ष्मण जोगदंड, स. सादुल्ला, दत्तराव वेणीकर, अनिल सूर्यतळ, ग्रा.पं.सदस्य सीताराम गजभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे