शिक्षक भारतीचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:25+5:302021-08-12T04:33:25+5:30
२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, माध्यमिक शिक्षकांच्या २०१२ पासून बदल्या झाल्या नाहीत, त्या कराव्यात, माध्यमिक ...

शिक्षक भारतीचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, माध्यमिक शिक्षकांच्या २०१२ पासून बदल्या झाल्या नाहीत, त्या कराव्यात, माध्यमिक शिक्षकांची पदोन्नती तसेच संचमान्यता त्वरित करून शाळेमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा, जिल्ह्यातील अराजपत्रित मुख्याध्यापकांची पदे पदोन्नतीने तत्काळ भरावी, प्रलंबित संच मान्यता त्वरित करून विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे मान्य करावीत. माध्यमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामातून पूर्णतः सूट द्यावी. संच मान्यतेत कला क्रीडा व हिंदी शिक्षकांचा समावेश करावा. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना किमान १८ हजार रुपये मानधन करावे. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत कावरखे, रमेश कावरखे, सुरेश वानखेडे, राजू डोळस, शिवलिंग साखरकर, त्र्यंबक भोसले आनीस शहा, एस एन आळने,पंडित अवचार, नागोराव श्रीरामे, विजय खिल्लारी आदी उपस्थित होते.