काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:46 IST2018-07-18T00:45:22+5:302018-07-18T00:46:49+5:30

अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जाहीर केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांची कायम आमंत्रित सदस्य म्हणून निवड जाहीर केली आहे.

 Seventh on the Working Committee of Congress | काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर सातव

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर सातव

हिंगोली : अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जाहीर केलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत गुजरात राज्याचे प्रभारी खा.राजीव सातव यांची कायम आमंत्रित सदस्य म्हणून निवड जाहीर केली आहे.
देश पातळीवर काम करणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा या ५१ सदस्यांत समावेश आहे. यात कायम आमंत्रित १८ नेत्यांची काँग्रेस कार्य समिती आहे. यात खा.राजीव सातव यांच्यासह माजी मंत्री पी.चिदंबरम, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सुरजेवाल, महाराष्ट्रातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खा. रजनी पाटील आदींचा समावेश आहे.

Web Title:  Seventh on the Working Committee of Congress