कळमनुरी तालुक्यात सातवांची संवादयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:11 IST2018-01-17T00:11:38+5:302018-01-17T00:11:41+5:30
कळमनुरी तालुक्यातील बाळापूर परिसरातील गावांमध्ये खा.राजीव सातव यांनी सर्व लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाºयांना सोबत घेऊन संवादयात्रा काढली आहे.

कळमनुरी तालुक्यात सातवांची संवादयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बाळापूर परिसरातील गावांमध्ये खा.राजीव सातव यांनी सर्व लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाºयांना सोबत घेऊन संवादयात्रा काढली आहे. ग्रामस्थांशी संवाद साधून अडीअडचणी, सुखदु:ख व विकासकामे याबाबत चर्चा केली जात आहे.
आखाडा बाळापूरजवळील कांडली येथे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा व बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार खा.राजीव सातव व आ.संतोष टारफे यांच्या हस्ते केला.
आडा येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. बोथी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.
माळधावंडा येथील स्व.साहेबराव किसनराव मस्के यांच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा नाईक, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जि.प.सदस्य भगवान खंदारे, सदस्य कैलास साळुंके, डॉ.सतीश पाचपुते, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, सरपंच अभय सावंत, दिलीप डुकरे, पं. स. सदस्य पतंगे, रणवीर, सचिन नरवाडे, संजय राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, रवि कोकरे, बबन डुकरे, लक्ष्मण खोकले, सरपंच सुभाष धनवे, वानोळे, मारोती डुकरे, विठ्ठल देवकर, विजय भिसे, रामू खरात, नागोराव धनवे व इतर कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या गावाच्या भेटीदरम्यान मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.