औंढा रोडवरील सात रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:51+5:302021-09-02T05:03:51+5:30
गत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण तसे कमीच आढळून येत आहेत. दरम्यान, औंढा रोडवर असलेल्या इमारतीत कोरोनाचे ७ रुग्ण उपचार ...

औंढा रोडवरील सात रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलविले
गत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण तसे कमीच आढळून येत आहेत. दरम्यान, औंढा रोडवर असलेल्या इमारतीत कोरोनाचे ७ रुग्ण उपचार घेत होते. यात ६ रुग्ण निगेटिव्ह होेते, तर १ रुग्ण पॉझिटिव्ह होता. ३१ ऑगस्ट रोजी औंढा रोडवरील इमारतीतून जिल्हा रुग्णालयात नेतेवेळेस पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तोही निगेटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे हे सातही रुग्ण आजमितीस निगेटिव्हच आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये या सर्व रुग्णांना दाखल केले आहे. मध्यंतरी जिल्हा रुग्णालयात कोरोना सेंटरमध्ये थोडे काम सुरू होते. त्यामुळे त्यांना औंढा रोडवरील रुग्णालयात पाठविले होते. सध्या जिल्हा रुग्णालयात भरपूर जागा असून, एकाच इमारतीत रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.