कोरोनाचे नवे सात रुग्ण; सहा बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:26 IST2021-01-17T04:26:14+5:302021-01-17T04:26:14+5:30

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी हिंगोली १, सेनगाव ४, कळमनुरी २१ अशा २६ ॲंटीजेन चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोलीत भट ...

Seven new patients of the corona; Heal six | कोरोनाचे नवे सात रुग्ण; सहा बरे

कोरोनाचे नवे सात रुग्ण; सहा बरे

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी हिंगोली १, सेनगाव ४, कळमनुरी २१ अशा २६ ॲंटीजेन चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोलीत भट कॉलनी ४, आनंदनगर २, सेनगाव १ असे सात रुग्ण आढळून आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथून एकांब १, माळहिवरा २ अशा तिघांना तर वसमत येथून कुरुंदा १, पुयनी २ अशा तिघांना बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत एकूण ३ हजार ६३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ हजार ५०४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांपैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर एका अतिगंभीर रुग्णाला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Seven new patients of the corona; Heal six