शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

पाच गावांत मिळणार डिजिटल सहीचा सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:39 AM

सातबारा नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे पहिले पाऊल म्हणून सर्व सातबारांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र या सातबारातील दुरुस्तीची प्रक्रिया काही ठिकाणी शिल्लक आहे. ती १00 टक्के पूर्ण होताच प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे जिल्ह्यातील ५ गावांत प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल सहीचा सातबारा प्रत्येकाला मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सातबारा नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे पहिले पाऊल म्हणून सर्व सातबारांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र या सातबारातील दुरुस्तीची प्रक्रिया काही ठिकाणी शिल्लक आहे. ती १00 टक्के पूर्ण होताच प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे जिल्ह्यातील ५ गावांत प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल सहीचा सातबारा प्रत्येकाला मिळणार आहे.सध्या संगणकीकृत सातबारा मिळत असला तरीही त्यावर सहीसाठी तलाठ्याकडे पुन्हा जावेच लागत आहे. शिवाय अनेक ठिकाणच्या सातबाराची योग्य प्रकारे दुरुस्तीच झाली नाही.क्षेत्रफळ जुळत नसल्याचे गोंधळ अथवा नावे चुकल्याचे प्रकार अजूनही समोर येत आहेत. या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेल्या पाच गावांची निवड करून या महिन्याअखेरीस या गावांतील नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळणार आहे. हळूहळू ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्वच गावांत राबविण्याची तयारीही सोबतच केली जाणार आहे.