सेनगाव पं. स. सभापतीपदी काँग्रेसचे संतोष खोडके बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:36+5:302021-04-17T04:29:36+5:30

येथील पंचायत समितीची सत्तासूत्रे पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात आली आहेत. काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी चार, शिवसेना पाच तर एक अपक्ष ...

Sengaon Pt. C. Congress's Santosh Khodke unopposed as Speaker | सेनगाव पं. स. सभापतीपदी काँग्रेसचे संतोष खोडके बिनविरोध

सेनगाव पं. स. सभापतीपदी काँग्रेसचे संतोष खोडके बिनविरोध

येथील पंचायत समितीची सत्तासूत्रे पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात आली आहेत. काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी चार, शिवसेना पाच तर एक अपक्ष अशा पंधरा सदस्यांचा पाठिंबा असलेले खोडके हे बिनविरोध सभापती झाले. या निवडणुकीत भाजपच्या चार तर काँग्रेसच्या एका पंचायत समिती सदस्यांनी सहभाग नोंदवला नसून, गैरहजर राहणे पसंत केले.

पंचायत समितीच्या सभापतीपदी आपल्या समर्थकाला बसविण्यात अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना यश आले. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत निवड बैठक घेण्यात आली. यावेळी सभापतीपदासाठी काँग्रेसचे पं. स. सदस्य संतोष खोडके यांचा एकमेव अर्ज आल्याने सभापतीपदी संतोष खोडके यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीला तहसीलदार जीवककुमार कांबळे, गटविकास अधिकारी बेले, नायब तहसीलदार केशव वीरकुंवर उपस्थित होते. निवडीनंतर सभापती खोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष अनिल पंतगे, माजी सभापती संजय देशमुख, द्वारकादास सारडा, सेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, प्रकाशराव देशमुख, भिकाजी अवचार, कांतराव हराळ, पिंटू गुजर, नंदकिशोर खिलारे, जगन्नाथ देशमुख, प्रवीण महाजन, उमेश देशमुख, संजय वाकोडे, प्रकाश वाघ, जितू देशमुख, गजानन पाटील, केशव भालेराव, खुशालराव हराळ, अशोक कावरखे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो................

Web Title: Sengaon Pt. C. Congress's Santosh Khodke unopposed as Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.