सेना, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा विरली - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:02+5:302021-09-02T05:04:02+5:30
दुसरीकडे काही दिवसांपासून काँग्रेसचे दोन्ही गट सक्रिय झाले होते. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघटन व पक्षकार्य न केल्यास ...

सेना, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा विरली - A
दुसरीकडे काही दिवसांपासून काँग्रेसचे दोन्ही गट सक्रिय झाले होते. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघटन व पक्षकार्य न केल्यास जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दिवंगत खा. राजीव सातव यांच्यानंतर या पक्षाचे जिल्ह्यातील नेतृत्व कोण, असा एक प्रश्न समोर आला हाेता. त्यामुळे खा. सातव यांच्या गटाकडून जिल्हाध्यक्ष बदलासाठी काहीच हालचाली नसल्या तरीही माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर गटाने जिल्हाध्यक्षपदासाठी प्रयत्न चालविले होते. त्यामुळे सातव यांच्या गटातीलही काही जणांना जिल्हाध्यक्षपदाचे डोहाळे लागले होते. नुकतीच काँग्रेसचीही नांदेडला बैठक झाली. तेथे बदलाचे काही संकेत मिळाले नाही. त्यानंतर राज्य कार्यकारिणीवर डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी मिळाली. त्यामुळे आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेले इतर दोन पक्षांचे जिल्हाध्यक्षपद मात्र कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत कस लागणार
आगामी जि.प., पं.स., न.प., न.पं.च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कस लागणार आहे. त्यातच सध्या पक्ष बदलाचे संकेत अनेक जण देत आहेत. आपल्या सोबतच्यांना सांभाळण्याची मोठी कवायतही करावी लागणार आहे. घरच्यांना सांभाळून बाहेरच्यांशी लढण्याचे हे आव्हान कोण कोण पेलणार, हे आगामी काळातच कळणार आहे.