नीट परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:33+5:302021-09-11T04:29:33+5:30

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुर्तडी, नांदेड हादगांव रोड, वारंगाफाटा, जि. ...

Section 144 applies to proper examination centers | नीट परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू

नीट परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कुर्तडी, नांदेड हादगांव रोड, वारंगाफाटा, जि. हिंगोली आणि जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जि. हिंगोली या २ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. वरील सर्व परीक्षा केंद्रावर दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये विविध निर्बंध असतील. यामध्ये परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या २०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र, इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताला नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Section 144 applies to proper examination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.