कारवाईचा दुसरा दिवसही निरंकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:11 IST2018-06-25T01:11:07+5:302018-06-25T01:11:25+5:30
राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे सर्व आदेशित केलेले असले तरीही सलग दोन दिवस सुट्या आल्याने कारवाईच करता आली नाही. सोमवार पासून मात्र पथके शहरभर फिरुन कारवाईचा बडगा उगारणार आहेत.

कारवाईचा दुसरा दिवसही निरंकच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे सर्व आदेशित केलेले असले तरीही सलग दोन दिवस सुट्या आल्याने कारवाईच करता आली नाही. सोमवार पासून मात्र पथके शहरभर फिरुन कारवाईचा बडगा उगारणार आहेत.
जिल्ह्यात प्लास्टिकवर लागू करण्यात आलेल्या बंदीची जनजागृती करणे सुरु आहे. त्यातच २३ आणि २४ जून रोजी सलग सुट्या आल्याने, मात्र पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायतच्यावतीने कारवाईचा बगडाच उगरता आला नाही. त्यातच दोन दिवस जोरदार झालेल्या पावसामुळे बºयाच गावासह शहरात पाणी शिरले त्यामुळे नगर पालिका व नगर पंचायतीसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी यामध्येच गर्क होते. तर रविवारी पाऊस नसला तरीही सुटी असल्याने प्लास्टिक वापरणाºयावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दोन दिवस प्लास्टिक वापरणाºयांना मात्र दिलासा मिळाला. तर रविवारी अनेक विवाह प्रसंगातही प्लास्टिक ग्लास, थर्माकॉलच्या द्रोणाचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत होते. त्याच बरोबर राज्यसरकारने ज्या- ज्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्याचाह सर्वत्र वापर होत असल्याचे दिसून येत होते.
वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा ना., कळमनुरी या पाचही ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, सोमवारपासून मात्र प्लास्टिक वापरणाºयावर राज्य सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्लास्टिक बंदीने शहरात शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शहरातील विविध भागात पालिकेचे पथके फिरुन प्लास्टिकचा वापर होतो की नाही, याची पाहणी करणार आहेत. दरम्यान प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधिताला ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगितले. शहरात दोन पथके कार्यरत आहेत.
अजूनही अनेकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा आहे. वास्तविक पाहता हिंगोली पालिकेने आठ दिवसांपुर्वी कारवाई करुन ७ क्विंटल प्लास्टिक जप्त केले होते. मात्र अजूनही अनेक जण लपूनछपून वापर करीत आहेत.
प्लास्टिकचा वापर थांबविण्यासंदर्भात अनेकदा जनजागृती केली आहे. एवढे करुनही प्लास्टिक आढळून आल्यावर संबंधिताकडून दंड वसूल करणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.