शनिवारी १६६ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:17+5:302021-05-03T04:24:17+5:30

जिल्ह्यात शनिवारी नवे १९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट कॅम्पमध्ये १९६ जणांची तपासणी केली असता २६ ...

On Saturday, 166 patients were discharged after recovering | शनिवारी १६६ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले

शनिवारी १६६ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले

जिल्ह्यात शनिवारी नवे १९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट कॅम्पमध्ये १९६ जणांची तपासणी केली असता २६ रुग्ण आढळले; तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये १६५ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात ९६, वसमत परिसरात १८, कळमनुरी परिसरात ३०; तर सेनगाव परिसरातील २१ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात वडद येथील ४२ वर्षीय पुरुष, हिंगोली येथील ४१ वर्षीय पुरुष, घोटा देवी येथील ४५ वर्षीय पुरुष, अकोला बायपास, हिंगोली येथील ५५ वर्षीय महिला, अंतुलेनगर येथील ५९ वर्षीय पुरुष, शिंदे गल्ली नांदापूर येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दरम्यान, १६६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात हिंगोली सामान्य रुग्णालयातील ६३, लिंबाळा ३४, वसमत ३४, कळमनुरी २५, तर सेनगाव येथील १० बऱ्या झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: On Saturday, 166 patients were discharged after recovering