कौठा येथील सरपंचास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:25 IST2018-03-31T00:25:03+5:302018-03-31T00:25:03+5:30
तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवजही चोरून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

कौठा येथील सरपंचास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवजही चोरून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वसमत तालुक्यातील कौठा येथील यात्रेनिमित्त कुस्तीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात सरपंच राजाराम खराटे यांच्याशी वाद घालण्यात आला. सरपंच त्यांच्या भावाच्या दवाखान्यात गेले असता त्यांना तेथे येवून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तसेच १ लाख रुपये किंमतीचे लॅकेट व खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याची तक्रार राजाराम खराटे यांनी दिली आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली होती. या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी संतोष खराटे रा. कौठा याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी.एम. कांबळे करीत आहेत.