वाळू चोरटे पीकअप वाहनासह मोबाईल जागेवर सोडून पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST2021-08-15T04:30:43+5:302021-08-15T04:30:43+5:30

वसमत तालुक्यातील किन्होळा ते बोरगाव रोडवरील आसना नदीतून वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी काहीजण वाहनासह गेले असल्याची माहिती वसमत ग्रामीण ...

The sand thieves fled leaving the pickup vehicle in the mobile space | वाळू चोरटे पीकअप वाहनासह मोबाईल जागेवर सोडून पळाले

वाळू चोरटे पीकअप वाहनासह मोबाईल जागेवर सोडून पळाले

वसमत तालुक्यातील किन्होळा ते बोरगाव रोडवरील आसना नदीतून वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी काहीजण वाहनासह गेले असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्यासुमारास पोलीस आसना नदी परिसरात दाखल झाले. यावेळी एक पीकअप वाहनात दोघे वाळू चोरीसाठी आले होते. पोलिसांना पाहताच वाळू चोरीसाठी आलेले पळून गेले. यावेळी पोलिसांनी एक पीकअप वाहन, सहा टोपले, तीन खोरी, वाळू चाळण्याची चाळणी, दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखींविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना एम. व्ही. आडे करीत आहेत.

Web Title: The sand thieves fled leaving the pickup vehicle in the mobile space