शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

नमुना आठवरील खरेदी-विक्री बंद..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:31 AM

गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे. लोकल एन.ए.च्या नावाखाली हा धंदा सुरू आहे. फक्त नमुना नं. आठ च्या आधारावरील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र कांबळे यांनी कळमनुरीच्या दुय्यम निबंधकास दिले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच यांना हाताखाली धरून भूखंडमाफियांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्यावर टाच येणार आहे.कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, कृष्णापूर, कोंढूरसह अनेक गावांमध्ये ग्रामसेवक हे गावठाणाबाहेरील व गावठाणापासून २०० मिटर अंतरावरील शेतजमिनीचे भूखंड तयार करून त्याची नोंद नमुना नं. ८ ला घेत आहेत. तसेच अशा जमिनीवरील बांधकामांना देखील बांधकाम परवाना दिल्या जात आहेत. खुल्या आरक्षीत भूखंडावरही नमुना नं. ८ खाजगी व्यक्तीच्या नावे करून त्याची खरेदी विक्री करून लाखोंची उलाढाल होत आहे. हे सर्व कृत्य बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत केवळ नमुना नं. ८ चे आधारावर खरेदी-विक्री व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिले आहेत. खरेदी-विक्री करताना दस्तामध्ये अकृषीक परवानगी घेण्यात आली आहे. किंवा नाही याबाबत दक्ष राहून कागदपत्रांची पडताळणी करावी. अकृषीक प्रमाणपत्र नसल्यास खरेदी-विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अकृषिक प्रमाणपत्र नसल्यास सदर भूखंड गावठाणाबाहेरील नसल्याचे संबंधीत तलाठ्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असेही आदेशात म्हटले आहे. ८ जानेवारी २०१९ रोजी तहसीलदार वाघमारे यांनी कळमनुरीच्या दुय्यम निबंधकास हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे भूखंडमाफिया व सरपंच, ग्रामसेवक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामसेवक, सरपंच व भूखंडमाफिया यांच्या संगणमताने अनेक भूखंडाची खरेदी-विक्री करून लाखोची उलाढाल होत आहे. हा गोरखधंदा आता प्रशासनापुढे उघड झाला आहे. हा आदेश दिल्याने या गोरखधंद्याला चाप बसणार आहे. हे पत्र मिळाल्यानंतर अनेक ग्रामसेवक यांनी तहसीलदारांकडे धाव घेतल्याची चर्चा आहे. जुने प्रकरण उकरू नका, अशीही विनंती केल्याचे कळते.लोकल एन.ए.च्या नियमावलीचा गैरअर्थ लावून अनेक ग्रामसेवक यांना गावठाण बाहेरील व खुल्या भूखंडाचे नमुना नं. ८ ला नोंद करून खरेदी-विक्री होत आहे. याबाबत आखाडा बाळापूर, शेवाळा, कृष्णापूर, कोंढूर, डोंगरगावसह केवळ नमुना नं. आठ वर खरेदी विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत. जे जूने प्रकरणे बेकायदेशीररित्या खरेदी विक्री केली आहे. त्याची चौकशी करून त्याबाबत ते रद्दबातल करण्याचे दोषींना दंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल असे प्रतिक्रया तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. या आदेशामुळे मात्र आता भूखंडमाफियांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्यावर टाच येणार आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारी