दोन तासात १२ किलो चिप्सची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:51+5:302021-06-22T04:20:51+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात २०१८ पासून अभियानाची अंमलबजावणी ...

Sale of 12 kg chips in two hours | दोन तासात १२ किलो चिप्सची विक्री

दोन तासात १२ किलो चिप्सची विक्री

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात २०१८ पासून अभियानाची अंमलबजावणी चालू आहे.

महिलांच्या वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत व कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. त्यातून महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय चालू केले आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, जिल्हा अभियान व्यवस्थापक जी.व्ही. मोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बचतगट कार्य करीत आहेत.

२१ जून रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. हिंगोली अंतर्गत नर्सी (नामदेव) येथील गुरुकृपा महिला स्वयंसहायता गटातील रोहिणी अनिल गायकवाड यांनी बँकेचे कर्ज काढून केळी चिप्स हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या केळी चिप्स जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात दाखविण्यासाठी आणल्या होत्या. परंतु, अवघ्या २ तासामध्ये १२ किलो चिप्स विकल्या गेल्या. यामुळे त्यांना २ हजार ८०० रुपयांचा फायदा झाला.

Web Title: Sale of 12 kg chips in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.