शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही; जनतेने त्यांना मतदानातून धडा शिकवावा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 8:56 PM

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही.

वसमत (हिंगोली ) : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे आता जनतेने सत्ताधाऱ्यांना मतदानाद्वारे धडा शिकवावा. आगामी निवडणूकीत परिवर्तन घडवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. वसमत येथे आयोजित परिवर्तन निर्धार सभेत ते मार्गदर्शन करत होते.

वसमत येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवतर्नाची निर्धार सभा घेण्यात आली. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मार्गदर्शन करताना केंद्रात व राज्यात शेतीची व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची माहिती व जाण नसलेले लोक सत्तेत आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत व्यक्त करून आता त्यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात भाजप सरकारवर कडाडून टिका केली. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला अडीच वर्ष तुरूंगात डांबले. दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाचे बांधकाम दर्जेदार केले. चांगले काम करवून घेतले. शंभर कोटी रुपयांचे हे काम होते. त्या गुत्तेदाराला अद्यापपर्यंत एक रुपयाही सरकारने दिलेला नाही तरीही माझ्यावर ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा बिनबुडाचा आरोप केल्याचे छगन भुजबळ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनगर आरक्षणाचा शब्द सरकारने दिला होता. तो अद्याप पूर्ण केलेला नाही. पंतप्रधानांनी १५ लाख रुपये खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करून हे सरकार सत्तेवर आले असल्याचे सांगून आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धोंडीराम पार्डीकर यांनी केले. सभेस मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसHingoliहिंगोली