‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी आज आॅनलाईन सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:25 IST2018-03-13T00:25:46+5:302018-03-13T00:25:49+5:30
मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे.

‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी आज आॅनलाईन सोडत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मोफत शिक्षक हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १३ मार्च रोजी हिंगोली येथील सर्व शिक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी पार पडणार आहे.
आरटीई २५ टक्के आरक्षित ६९२ जागेसाठी आॅनलाईद्वारे पालकांनी अर्ज सादर केले आहेत. ११ मार्च ही अंतिम तारीख होती. १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची निवड झाली, त्यांच्या पालकांनी १४ ते २३ मार्चपर्यंत संबधित शाळेत मूळ कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तर शाळांनी २६ मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना आहेत. निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. मंगळवारी सोडतीला पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे केले आहे. आरक्षित ६९२ जागांसाठी १०१३१ जणांनी आरटीई २५ टक्केसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. लॉटरी सोडतीस शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व पालकांची उपस्थिती असणार आहे.