शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तला १६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:45 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांची काटेकोर तपासणी चालविली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामे घेवून ती थातूर-मातूर पद्धतीने आटोपण्याचा फंडा बंद झाला आहे. यात गतवर्षी अनेक ठिकाणची कामे सुरूच झाली नाही किंवा सुरू झाली तर ती अजून पूर्ण नाहीत. त्यातच वाळूची समस्याही अनेक कामांच्या मुळावर उतरली आहे. कृषी विभागामार्फत होणाऱ्या अनेक कामांत कंत्राटदारांनी बिलो दराच्या निविदा टाकून पुन्हा कामांना हात न लावल्याचे चित्र आहे. २0१७-१८ मध्ये एकूण २४७७ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी २४६९ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली होती. तर २४३0 कामांची निविदा प्रक्रिया झाली होती. यापैकी २३४0 कामांना कार्यारंभ आदेश दिला होता. यातील १९७५ कामे पूर्ण करून १३.२६ कोटींचा खर्च झाला. यात हिंगोली तालुक्यात २७२ कामांवर १.८४ कोटी, कळमनुरीत ३९८ कामांवर २.७0 कोटी, औंढ्यात ४२५ कामांवर ४.४५ कोटी, सेनगावात ४८५ कामांवर २.५५ कोटी तर वसमतला ३९५ कामांवर १.७२ कोटी खर्ची पडले. याशिवाय २५२ कामे प्रगतीत असून त्यावर ६.१८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यात ढाळीचे बांध १६८, खोल सलग समतल चरग१0१, शेततळे ३८९, वनतळे-२0, मातीनाला बांध ३१, साखळी सिमेंट बंधारे २५, नाला खोलीकरण, सरळीकरण- ३४५, गाळ काढणे- ६८, रिचार्ज शाफ्ट- २५५, ठिबक सिंचन-२३५, तुषार सिंचन ३३५ अशी कामे झाली आहेत. या योजनेत आराखडा ५८ कोटींचा होता. मात्र प्रत्यक्षात ३४ कोटींच्याच निविदा निघाल्या होत्या.१0 गावे वाढली : जुनी कामेही सुरूच२0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ गावे निवडली होती. यात २६७२ कामे प्रस्तावित असून ५१.२१ कोटींचा आराखडा आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने नव्याने १0 गावे वाढविली असून त्यांचेही आराखडे बनविले जाणार आहेत. यात २५६ कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाली असून १.२३ कोटींचा खर्च झाला आहे. सध्या जलयुक्त शिवार योजनेत १६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यात नवीन कामे तर करायचीच आहेत, जुनीही पूर्ण करायची आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई