रस्त्याचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST2021-02-27T04:40:24+5:302021-02-27T04:40:24+5:30
पथदिवे अजूनही बंदच बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे मागील वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. अनेकदा ग्रामस्थांकडून गावातील पथदिवे ...

रस्त्याचे काम कासवगतीने
पथदिवे अजूनही बंदच
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे मागील वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. अनेकदा ग्रामस्थांकडून गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी करुनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सायंकाळपासूनच गावात अंधारमय वातावरण होत आहे. अंधाराचा फायदा घेत भुरट्या चोऱ्या होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.
हातपंप दुरूस्त करण्याची मागणी
कळमनुरी : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत. सध्या उन्हाळ्याची सुरूवात असून गावात पुढे पाणीटंचाई निर्माण होवू नये यासाठी बंद पडलेले हातपंप दुरूस्त करण्यात यावे़ अशी मागणी शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागातून होत आहे.
दिशाफलक लावण्याची मागणी
सेनगाव : तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले दिशाफलकांची मोठी दुरवस्था झाली आहे. तर काही दिशाफलक गायब झालेले आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना दिशाफलक अभावी गावांकडे जाणाऱ्याची रस्त्याची माहिती होण्यास अडथळा निर्माण होत आहे. यासाठी अशा मार्गाांवर दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.