पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महिन्याचे बजेट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:51+5:302021-07-31T04:29:51+5:30

हिंगोली : जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०८ रुपयांवर पोहोचला असून, इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला ...

Rising petrol prices cut the pockets of the common man; Monthly budget increased | पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महिन्याचे बजेट वाढले

पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महिन्याचे बजेट वाढले

हिंगोली : जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०८ रुपयांवर पोहोचला असून, इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यात महिन्याच्या खर्चात वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. सध्या पेट्रोल १०८.७७, तर डिझेलचा दर ९६.९२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. पेट्रोल व डिझेलवर चालणारी जिल्ह्यात जवळपास दीड लाखांच्या वर वाहने आहेत. विशेष म्हणजे विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षाही आपल्या वाहनांमध्ये वापरल्या जाणारे पेट्रोल महाग आहेत. सध्या हिंगाेली शहरात ३० हजार लिटर पेट्रोल, तर ६० हजार लिटर डिझेलची विक्री होते. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. दुप्पट खर्च वाढल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

उत्पन्न कमी, खर्चात वाढ

अगोदरच उत्पन्न कमी असल्याने घरखर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. कामे लवकर होण्यासाठी दुचाकी वाहन वापरावे लागते. मात्र, पेट्रोलचे दर वाढल्याने खर्च दुप्पट वाढला आहे. कोरोनामुळे महागाईत भर पडल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.

-भुजंग मुसळे

पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहन चालवावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. उत्पन्न कमी व खर्च जास्त. त्यात महागाई यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हावेत.

-शैलेश मुंडे

कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेच्या ठिकाणी हजार

-कोरोनानंतर महागाईत मोठी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक खर्चावर झाला असून, सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

- दररोज वापरल्या जाणाऱ्या वाहनासाठी पेट्रोल तेवढेच लागत असले तरी त्याची किंमत मात्र दुप्पट मोजावी लागत आहे.

त्यामुळे पूर्वी ५०० रुपयांत होणाऱ्या कामासाठी आता १००० रुपये लागत आहेत.

हा बघा फरक (दर प्रतिलिटर)

पेट्रोल - १०८.७७

डिझेल - ९६.९२

हिंगोली शहरातील पेट्रोल पंपांची संख्या - १०

दररोज लागणारे पेट्रोल - ३० हजार लिटर

जिल्ह्यातील वाहने

दुचाकी - १५३०९६

चारचाकी - १४६८२

Web Title: Rising petrol prices cut the pockets of the common man; Monthly budget increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.