हिंगोली जिल्ह्यात दिवसभर रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST2021-09-22T04:33:28+5:302021-09-22T04:33:28+5:30
हिंगोली: जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळी आठपूर्वीच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी पावसाची नोंद ...

हिंगोली जिल्ह्यात दिवसभर रिपरिप
हिंगोली: जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळी आठपूर्वीच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के म्हणजेच ९०२ मिमी एवढे पर्जन्य झाले आहे. काल रात्री विविध भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात हिंगोली ११ मिमी, कळमनुरी १० मिमी, वसमत ८ मिमी, औंढा २४ मिमी, सेनगाव १७ मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद झाली, तर औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे १२ दरवाजे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान उघडण्यात आले आहेत, तर पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे तीन दरवाजे यापूर्वीच उघडले आहेत. मंगळवारी दिवसभरही पावसाची रिपरिप सुरूच होती.