रिक्षाचालकाने पैसे व मोबाईल केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:43 IST2018-10-17T00:42:48+5:302018-10-17T00:43:16+5:30
पेन्शनपुरा भागात उतरलेल्या प्रवासी महिलेची रिक्षातच विसरून राहिलेली पैशांची पर्स व मोबाईल परत करून रिक्षाचालकाने इमानदारीचे दर्शन घडविले आहे.

रिक्षाचालकाने पैसे व मोबाईल केला परत
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : पेन्शनपुरा भागात उतरलेल्या प्रवासी महिलेची रिक्षातच विसरून राहिलेली पैशांची पर्स व मोबाईल परत करून रिक्षाचालकाने इमानदारीचे दर्शन घडविले आहे.
हिंगोली शहरात दिवसभर रिक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणारे युसूब रन्नू नवरंगाबादी यांनी १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी एक भाडे मिळाले. शिवाजी चौक येथून पेन्शनपुरा येथे प्रवाशांना सोडले. त्यानंतर घराकडे परतत असताना मागील सिटवर एका महिलेची पर्स आणि मोबाईल विसरून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पर्समध्ये २८०० रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. या रिक्षाचालकाने इमानदारीने हे साहित्य त्यांच्या घरी नेवून दिले.
पैशांसह महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. तर चालकाचे कौतुक करण्यात आले.