खासगी रुग्णालयांना उसने दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन घेतले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:26+5:302021-09-09T04:36:26+5:30
हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत शहरातील ५ खासगी रुग्णालयांना ९० रेमडेसिविर इंजेक्शन उसनवारीवर दिले होते. कोरोना महामारी कमी ...

खासगी रुग्णालयांना उसने दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन घेतले परत
हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत शहरातील ५ खासगी रुग्णालयांना ९० रेमडेसिविर इंजेक्शन उसनवारीवर दिले होते. कोरोना महामारी कमी होताच उसने दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा रुग्णालयाने परत घेतले आहेत.
कोरोना काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. त्या काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहरातील ५ खासगी रुग्णालयांना ९० इंजेक्शन उसनवारीवर दिले होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे दिलेले इंजेक्शन परत घेतले आहेत. आजमितीस जिल्हा रुग्णालयात ७७१८ रेमडेसिविर इंजेक्शन शिल्लक आहेत, असे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.
कोणाला दिले किती?
परत मिळाले किती?
रुग्णालय दिले किती मिळाले किती
माऊली कोविड सेंटर १४ १४
तिरुमला कोविड सेंटर १७ १७
पतंगे कोविड सेंटर १४ १४
जगदंबा कोविड सेंटर २४ २४
द्वारका कोविड सेंटर २१ २१
खासगी रुग्णालयांना केली सूचना...
कोरोना काळात उसनवारीवर शहरातील पाच खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले होते. त्यानंतर कोरोना संपताच रुग्णालयांना इंजेक्शन परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. पाचही खासगी रुग्णालयांनी उसने दिलेले इंजेक्शन परत केले आहेत.
जेवढे दिले तेवढे परत...
कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू होताच शहरातील पाच खासगी रुग्णालयांना ९० रेमडेसिविर इंजेक्शन दिले. या रुग्णालयांना इंजेक्शन परत करण्याचे सांगितल्यावर त्यांनी ते परत केले आहेत.
प्रतिक्रिया...
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तेव्हा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणूनच पाच खासगी रुग्णालयांना उसनवारीवर इंजेक्शन दिले होते. १७०१८ रेमडेसिविर इंजेक्शन मागविले होते. सद्य:स्थितीत ७७१८ इंजेक्शन शिल्लक आहेत. ९३०० उपयोगात आणले आहेत.
डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
डमी ११४७