शेतकरीविरोधी काळा कायदा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:32+5:302021-02-09T04:32:32+5:30
हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी ...

शेतकरीविरोधी काळा कायदा रद्द करा
हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीमध्ये ७२ दिवसांपासून आंदोलन करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
संभाजी ब्रिगेड' चे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ निवेदन देत केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, ८ डिसेंबर २०२० रोजी संपूर्ण भारतबंदला पाठिंबा देत त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. शेतकरी या कायद्याच्या विरोधात असतील तर केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन तत्काळ कायदे रद्द करावे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
भारतरत्न देऊन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा सन्मान केला. शेतकरी अडचणीत असून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सर्व शेतकरी संघर्ष करत आहे. मात्र तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर त्यांना सन्मानाची वागणूक व पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.