शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

हिंगोली जिल्ह्यात ५० हजार बेरोजगारांची नोंदणी; अवघ्या १३३८ तरुणांनाच मिळाला रोजगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:56 IST

नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण

ठळक मुद्दे अनेक अजूनही संधीच्या प्रतीक्षेत कोरोनात रोजगार जाऊनही नोंदणी नाही

हिंगोली : रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे आधीच ४९ हजार २४३ जणांनी रोजगार मिळावा यासाठी नोंदणी केली असताना मार्च ते नोव्हेंबरदरम्यान आणखी १६८४ जणांची यात भर पडली आहे. आता एकूण बेरोजगारांची संख्या ५० हजार ९२७ असून यापैकी १३३८ जणांना मागील सात महिन्यांत रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०२० मार्चअखेर ४९ हजार २४३ बेरोजगारांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना काळात मात्र इतर सर्व विभागांप्रमाणेच या कार्यालयातही नवीन नोंदींची संख्या घटली होती. त्यातच कोरोनामुळे फिरण्यावर बंदी होती. शिवाय अनेक उद्योगही बंद पडले होते. त्यामुळे नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण होते. त्यामुळे या काळात रोजगारही मिळणे दुरापास्त झाले होते. आऑगस्टमध्ये पहिल्यांदा ३३ जणांना रोजगार मिळाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. या काळात रोजगार मेळावेही प्रत्यक्षात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून दिली.

रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसादजिल्ह्यात यंदा रोजगार मेळाव्यांचे प्रत्यक्ष आयोजन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आऑनलाइईन मेळाव्यांवर भर देण्यात आला होता. या मेळाव्यांचेही आयोजन सप्टेंबर महिन्यातच सर्वाधिक होते. त्याचा परिणामही चांगला झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. त्यानंतर दिवाळीमुळे पुन्हा हे मेळावे ठप्प झाले होते. आता राज्यस्तरीय मेळावाच होत असून यातही हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. हा मेळावाही ऑनलाइन आहे. यात ११२२ अर्ज आले आहेत. त्यातील किती जणांना संधी मिळेल, हे आगामी काळात कळणार असून अजून ही प्रक्रिया अंतिम झाली नाही.

यापूर्वीच्याच हजारो जणांनी नोंदणी केली असताना त्यांना कधी रोजगारासाठी स्वयंरोजगार कार्यालयाकडून साधा काॅल येत नाही. त्यामुळे मी बेरोजगार असलो तरीही नोंदणीच्या भानगडीत पडलो नाही. स्वत:च रोजगार शोधतो.- अमोल पाईकराव, बेरोजगार, साळवा

बेरोजगारांना रोजगाराच्या संधींसाठी अनेकदा मेळावे होतात. मात्र बऱ्याचदा त्यात तांत्रिक शिक्षणावर भर दिला जातो. त्यामुळे इतर शाखांच्या तरुणांना फारसा वाव मिळत नाही. तरीही काही तरुणांना मात्र या नोंदणीचा फायदा होतो. - राजू इंगोले, बेरोजगार,जांब

शासनाने विविध प्रकारची भरतीच मागील काही वर्षांपासून बंद केल्यात जमा आहे. शिक्षकांच्या तर जागाच निघत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्न केले तर तेथेही अनंत अडचणी आहेत. नोंदणी करूनही त्याचा काहीच फायदा नाही.- गजानन जगताप, बेरोजगार, हिंगोली

रोजगाराच्या संधीजिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आहेत. यापूर्वीही काही ऑनलाईन मेळावे झाले. त्यात हजारावर तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. याशिवाय काही शासकीय जागांवरही मुलांना संधी मिळाली आहे. बेरोजगार युवकांनी नाेंदणी केल्यास त्यांना याबाबत माहिती देऊन या संधींबाबत अवगत केले जाते. त्यात पुढे त्यांच्या काैशल्यानुरुप रोजगार मिळतो    - पी.एस.खंदारे, रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, हिंगोली

टॅग्स :HingoliहिंगोलीEmployeeकर्मचारी