शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पुन्हा सहा टँकर रॉकेलची नियतनघट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:00 AM

गॅस सिलिंडर स्टॅम्पिंगनंतर आता वाढीव गॅस जोडण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रॉकेलचे नियतन घटले आहे. जिल्ह्यातील पाच टँकर रॉकेल कमी झाले असून त्यामुळे रॉकेलच्या दुहेरी लाभामुळे होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गॅस सिलिंडर स्टॅम्पिंगनंतर आता वाढीव गॅस जोडण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रॉकेलचे नियतन घटले आहे. जिल्ह्यातील पाच टँकर रॉकेल कमी झाले असून त्यामुळे रॉकेलच्या दुहेरी लाभामुळे होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात कधीकाळी साडेतीन हजार केएल रॉकेल मिळायचे. नंतर नियतन घटल्याने ते अडीच हजार, दीड हजार व आता केवळ साडेसातशे केएलपर्यंत खाली आले होते. मागील काही दिवसांपासून एवढेच केएल रॉकेल येत होते. १२ केएलचे एक टँकर असते. जिल्ह्याच्या नियतनातून ६0 केएल रॉकेल पुन्हा एकदा कमी झाले आहे. जिल्ह्यात दोन जोडण्या असलेले सिलिंडरधारक हिंगोली-७८१४ण कळमनुरी ४७७, सेनगाव-२५१३, वसमत-४९७0 तर औंढ्यात १५३६ एवढे आहेत. त्यात नव्याने काही बदल झाला नाही. तर एक गॅस जोडणी असलेले शिधापत्रिकाधारक हिंगोली १४५४0, कळमनुरी-३६९७, सेनगाव-८७७१, वसमत-१0९७२, औंढा-३२९६ असे एकूण ४१ हजार २७६ एवढे होते. नव्याने शोधलेल्या गॅस जोडणी धारकांमुळे आता यात ५७ हजार २४३ जण असल्याचे समोर आले आहे. यात हिंगोली-१७८४६, कळमनुरी-८५४७, सेनगाव-११६३८, वसमत-१४७0४, औंढा-४५0८ अशी वाढल्यानंतरची संख्या आहे.यासाठी सर्व तहसीलदारांना आदेशित केले होते. त्यानंतर त्यांनी ही नवीन आकडेवारी सादर केली. यातील जोडणीधारकांच्या नावचे रॉकेल नियतन कमी करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने नियतन मंजूर असले तरी ते समर्पित केले जाणार आहे.अशी झाली घट : दरमहा १५ लाख वाचणारआता हिंगोलीचे १५६ हून १४४ केएल, कळमनुरीचे १९८ वरून १८0, सेनगावचे १२0 वरून १0८, वसमतचे १५0 वरून १३८ तर औंढ्याचे १२0 वरून ११४ केएल एवढे नियतन झाले आहे. हिंगोली, सेनगाव, वसमतचे एक, कळमनुरीचे दीड तर औंढ्याचे अर्धा टँकर नियतन घटले.प्रत्येक तालुक्यात रेशनवरील रॉकेलचा दर वेगळा आहे. यात हिंगोली-२४.१६, वसमत-२४.६0, कणमनुरी-२४.२९, सेनगाव-२४.३६ तर औंढ्यात २४.३0 रुपये असा दर आहे. त्यामुळे सरासरी २४.२५ रुपये दर पकडला तरी दरमहा १५ लाख रुपये बचत होणार आहे.रॉकेलचे दरही मागील काही महिन्यांपासून महिन्यात दोनदा २५ पैशांनी वाढविले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळा दर असतो. ही वाढ दिसायला कमी असली तरीही एका वर्षात सहा रुपये एवढी आहे.