शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:13 IST

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे.

हिंगोली : राज्याच्या गृहविभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पदभरती करण्यासाठी ५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जात आहे. गुजरातच्या एजन्सीमार्फत ही परीक्षा होत असून, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी जरी पदभरती असली तरी परीक्षेचे केंद्र मात्र गुजरातमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये १७ डिसेंबर २०२४च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत वैज्ञानिक सहायक ही पदे फॉरेन्सिक ॲप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (एफएसीटी) ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून भरली जात आहेत. तर सहायक रासायनिक विश्लेषकांची १६६ पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी ५ व ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबसाठी ही पद भरती होत आहे. तेव्हा साहजिकच महाराष्ट्रातून अनेक उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकही केंद्र नाही. गुजरात येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, शासनाने या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडे घेतली धावया प्रकारानंतर फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असून, ही भरती राज्यातील फॉरेन्सिक लॅबसाठी केली जात असून, यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु या परीक्षेसाठी महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. तेव्हा महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात