शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बाळांना घरी ठेवून कोरोनातही कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस खऱ्या ' वॉरियर्स '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खऱ्या अर्थाने पोलीस व आरोग्य विभागावर जबाबदारी आली आहे. यात महिला पोलीसही मागे ...

हिंगोली : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खऱ्या अर्थाने पोलीस व आरोग्य विभागावर जबाबदारी आली आहे. यात महिला पोलीसही मागे नसून कोरोनातही घर सांभाळत रात्री उशिरापर्यंत कर्तव्य पार पाडावे लागत आहे. खऱ्या अर्थाने महिला पोलीस ' कोरोना वॉरियर्स ' ठरत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य, नगरपालिका विभागासह पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. पोलिसांना रात्रंदिवस सतर्क राहावे लागत आहे. यात महिला पोलीसही मागे नसून कोरोनातही एक योद्धाप्रमाणे कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊन काळातही नेमून दिलेल्या पॉईंटवर रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावताना दिसत होत्या. वेळप्रसंगी कठोर हाेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे कामही तेवढ्याच नेटाने त्यांनी केले. आताही कोरोना हद्दपार झाला नसल्याने तेवढ्याच हिंमतीने त्या कर्तव्य बजावत आहेत. लहान बाळांची पालन पोषणाची जबाबदारी पार पडत असताना कर्तव्यालाही प्राधान्य दिले. दोन्ही बाजू सांभाळताना त्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे. एकदा ड्युटीवर आले की, रात्री उशिरापर्यंत घरी जाता येत नाही. मुले लहान असतानाही त्यांना आईची माया मिळावी यासाठी मोबाईल व्हिडिओ कॉलवरूनच संपर्क ठेवावा लागत आहे. त्यातही घरी गेल्यानंतरही कोरोना संसर्ग घरात शिरणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे. घर व कर्तव्याचा समतोल साधणाऱ्या महिला पोलीस खऱ्या कोरोना वॉरियर्स ठरल्या आहेत.

एकूण पोलीस अधिकारी - ७५

महिला पोलीस अधिकारी - ०७

एकूण पोलीस - १०८४

महिला पोलीस - १३४

महिला पोलिसांच्या प्रतिक्रिया...

१) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत ड्युटी बजावावी लागते. घरी लहान बाळ असले तरी त्याच्याशी मोबाईलवरून संपर्कात राहते.

- अनिता गोविंद जाधव, मपोना

२) लॉकडाऊन काळात अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. त्यावेळी बाळाची सारखी काळजी वाटत होती. आता दररोज रात्री उशिरापर्यंत ड्युटी नसते. त्यामुळे लहान बाळाच्या सहवासात राहता येते.

- दीपा अरुण दिगे, मपोना

३) ड्युटीवर असले तरी मोबाईलवरून बाळाच्या संपर्कात असते. अत्यावश्यक काम असल्यास घरी जाऊन यायला वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांची मदत मिळते.

त्यामुळे लहान बाळाची काळजी घेण्यास थोडासा वेळ मिळतो.

- उषा नागरगोजे, मपोना

४) लहान बाळांची काळजी घेण्यासाठी कुटुंबीयांची मदत मिळते. एखाद्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कर्तव्यासाठी थांबावे लागले तरी मोबाईलवरून बाळाच्या संपर्कात असते.

- संगीता तुकाराम ससाणे, मपोशी

मुलांच्या प्रतिक्रिया...

१) मम्मी पोलीस आहेत. कोरोनाची साथ चालू असताना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. कामावरून घरी आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असते. मुलगी म्हणून मला माझ्या मम्मीचा अभिमान आहे.

- ईश्वरी गजानन वारुळे

२) मम्मी ड्युटीवर असली तरी आम्ही तिच्याशी मोबाईलवरून संवाद साधतो. घरी असते तेव्हा पूर्ण वेळ माझ्यासाठी देते. त्यामुळे तेवढी काळजी वाटत नाही.

- विराज प्रीतम चव्हाण

३) कोरोना काळात पोलिसांच्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे मम्मीसुद्धा कर्तव्य बजावते. ड्युटीवर असताना काही आवश्यकता वाटली तर थेट मोबाईलवरून सांगत असतो.

- आर्यन सानप

४) मम्मी ड्युटीवर गेली तरी सारखी संपर्कात असल्याने आठवण येत नाही. घरी आल्यानंतर मात्र मी तिच्याजवळच असतो.

- शाैर्य राज शेळके