रियल इस्टेट बाजार जोरात; घरविक्रीच्या श्रावणसरी....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:34+5:302021-08-12T04:33:34+5:30
महागाईने कळस गाठला असला तरी नोकरदार, व्यापारी गुंतवणूक म्हणून घर व प्लाॅटची खरेदी करताना दिसून येत आहेत. सर्वसामान्यांना घर ...

रियल इस्टेट बाजार जोरात; घरविक्रीच्या श्रावणसरी....!
महागाईने कळस गाठला असला तरी नोकरदार, व्यापारी गुंतवणूक म्हणून घर व प्लाॅटची खरेदी करताना दिसून येत आहेत. सर्वसामान्यांना घर किंवा प्लाॅट खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घराचे स्वप्न अधुरेच राहात आहे. विटा, वाळू, बांधकामाच्या साहित्यांचे दर गगनाला भिडल्याने घर बांधणे कठीण झाल्याचे बिल्डर सांगत आहेत, तर दुसरीकडे घराच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने सर्वसामान्यांना घर घेणे परवडेनासे झाले असल्याचे तेवढेचं खरे आहे.
- गुंतवणूक म्हणून घर घेणारे अधिक
व्यापारी, नोकरदारवर्ग कधीही पुढचा विचार करत असतो. लाॅकडाऊनमध्ये तर व्यापाऱ्यांना खूप आर्थिक झळ सोसावी लागली. सर्वसामान्य मनुष्य कधीच घर विकत घेत नाही. व्यापारी आणि नोकरदारवर्गच गुंतवणूक म्हणून घर खरेदी करत असतो. महागाईने कळस गाठल्यामुळे बिल्डरलाही घर बांधणे कठीण झाले आहे.
- राजेश बियाणी, बिल्डर, हिंगोली
घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
सध्या महागाईने कळस गाठला असून, घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. काही जण प्लाॅट खरेदी करून गुंतवणूक करीत असल्याचे एका खरेदीदाराने सांगितले.
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु महागाई आडवी येत आहे. त्यात रेडिमेड घरांचे भाव तर अव्वाच्या सव्वा होऊन बसले आहेत.
- सुशांत देशमुख टाकळीकर