तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; जिल्ह्यात दोन हजारांवर बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:15+5:302021-05-14T04:29:15+5:30
नागरिकांनी सामाजिक अंतर आणि मास्क वापरल्यास कोरोनाची तिसरी लाटही रोखण्यात यश मिळू शकते. जिल्ह्यात आजमितीस १८ कोविड सेंटर ...

तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; जिल्ह्यात दोन हजारांवर बेड
नागरिकांनी सामाजिक अंतर आणि मास्क वापरल्यास कोरोनाची तिसरी लाटही रोखण्यात यश मिळू शकते. जिल्ह्यात आजमितीस १८ कोविड सेंटर अस्तित्वात आहेत. १ हजार ८३४ साधे बेडस् उपलब्ध असून ८०७ बेडस् हे ऑक्सिजनसह तयार आहेत. अतिगंभीर रुग्णालाच ऑक्सिजन बेडस्ची व्यवस्था करून दिली जाते. कोणताच आजार नसेल तर साधा बेडस् उपलब्ध करून दिला जातो.
प्रतिक्रिया............
ऑक्सिजन
आजमितीस जिल्ह्यात ऑक्सिजनचे १३ केएलचे ३ आणि १० केएलचे १ असे चार टँक उपलब्ध आहेत. गरज पडल्यास शासनाला कळविले जाणार आहे.
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात आजमितीस ऑक्सिजन बेड हे ८०७ उपलब्ध आहेत. अतिगंभीर रुग्णाला ऑक्सिजन बेडवर ठेवले ठेवून त्याची काळजी घेतली जाते.
कोविड केअर सेंटर
कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात सद्य:स्थितीत १८ कोरोना केअर सेंटर उपलब्ध आहेत. सर्व रुग्णांची काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते.
औषधी
कोरोना रुग्णांची संख्या पाहता औषधीसाठा आजतरी भरपूर प्रमाणात आहे. औषधी संपल्यास शासनाला कळविले जाईल.
तिसरी लाट रोखणे हे नागरिकांच्या हाती आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत सामाजिक अंतर ठेवल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो. बाहेर पडताना मास्कचा वापर करणे हेही अगत्याचे आहे.
डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक