पैशाची मागणी करत रेशन दुकानदारास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:51+5:302021-02-05T07:52:51+5:30
शहरातील नगर परिषद वसाहत परिसरातील गौरी मोहम्मद राजा मुनीरखान यांचे अंतुलेनगरातील विवेकानंदनगर पाटीजवळ रेशनचे दुकान आहे. २९ जानेवारी रोजी ...

पैशाची मागणी करत रेशन दुकानदारास मारहाण
शहरातील नगर परिषद वसाहत परिसरातील गौरी मोहम्मद राजा मुनीरखान यांचे अंतुलेनगरातील विवेकानंदनगर पाटीजवळ रेशनचे दुकान आहे. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गौरी मोहम्मद राजा मुनीरखान हे दुकानाचे शटरचे कुलूप लावत होते. याच वेळी हिंगोली शहरातील राहुल खिल्लारे, निखील डोरले, प्रफुल्ल सूर्यवंशी, नितीन घोडके यांनी दगड, फरशी व खुर्चीने मारहाण केली. यामध्ये गौरी मोहम्मद यांच्या डोके, मान, छाती तसेच डाव्या पायाला मार लागला. मारहाण होत असल्याने गौरी मोहम्मद हे जोराने ओरडत असल्याने शेख मस्तान शेख रमजानी, अब्दुल मलिक सोलंकी, तौफिक गौरी हे धावून आले. त्यामुळे मारहाण करणारे जीवे मारण्याची धमकी देत पळून गेले. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी उपचारासाठी दुचाकीवर शासकीय दवाखाना परिसरात सोडले. ही माहिती नातेवाईकांना समजल्याने त्यांनी दवाखान्यात धाव घेत त्यांना उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी त्यांच्या जबाबावरून शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक मारोतराव करीत आहेत.