डॉक्टरचा परिचारिकेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 04:50 IST2018-02-09T04:50:55+5:302018-02-09T04:50:58+5:30

डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार आखाडा बाळापूर येथे उघडकीस आला आहे.

Rape of a doctor's nurse | डॉक्टरचा परिचारिकेवर बलात्कार

डॉक्टरचा परिचारिकेवर बलात्कार

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार आखाडा बाळापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी डॉक्टरवर बलात्काराचा, तर वडिलांवर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला.
आखाडा बाळापूर येथील डॉ. प्रेम ओमप्रकाश ठमके हा देहू रोड, पुणे येथील अरजकर रुग्णालयात नोकरीला होता. याच रुग्णालयात गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथील २४ वर्षीय तरुणी परिचारिका म्हणून काम करीत होती. तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेम याने आॅगस्ट २०१५ ते २० डिसेंबर १७दरम्यान तिच्याशी शरीर संबंध ठेवले.
>ंडॉक्टरचे लग्न ८ दिवसांवर
डॉ. प्रेम ठमके याचा विवाह अन्य मुलीशी ठरला असून लग्नघटिका आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. विवाहाची पत्रिका पीडितेच्या हाती पडल्यानंतर तिने गुन्हा दाखल करण्याचा आग्रह केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Rape of a doctor's nurse