राखुंडे यांचा गळा आवळुन खुनच; डिग्रस क-हाळे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:23 IST2018-02-16T19:23:34+5:302018-02-16T19:23:56+5:30
डिग्रस क-हाळे येथे गंगाधर गोविंदराव राखुंडे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गुरुवारी (दि.१५)आढळुन आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालावरून राखुंडे यांचा गळा आवळुन खुन केल्याचे स्पष्ट झाले.

राखुंडे यांचा गळा आवळुन खुनच; डिग्रस क-हाळे येथील घटना
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस क-हाळे येथे गंगाधर गोविंदराव राखुंडे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गुरुवारी (दि.१५)आढळुन आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालावरून राखुंडे यांचा गळा आवळुन खुन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिर हिंगोली ग्रामीण ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डिग्रस क-हाळे येथील गंगाधर राखुंडे हे बुधवारी रात्री राहत्या घरी झोपले होते. परंतु गुरुवारी सकाळी ६ वाजता राखुंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यावरून ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार व पथकाने भेट दिली असता राखुंडे यांचा मृतदेह मानेखाली जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. तसेच पोलिसांना मृतदेहाच्या मानेवर व्रण आढळले. यामुळे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत खुनाच्या दिशेने तपास सुरू केला होता.
जिल्हा रूग्णालयाकडून गुरूवारी रात्री उशिरा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर राखुंडे यांचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मुंजा गंगाधर राखुंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी डिग्रस येथील काही व्यक्तींची पोलीस ठाण्यात चौकशीही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होऊन आरोपी जेरबंद केले जातील अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार दिली.