राजमाता जिजाऊ जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:13+5:302021-01-13T05:18:13+5:30
डिग्रस कऱ्हाळे येथे जयंती साजरी डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात ...

राजमाता जिजाऊ जयंती साजरी
डिग्रस कऱ्हाळे येथे जयंती साजरी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणात माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे गावकऱ्यांच्या हस्ते पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा
सेनगाव : स्वराजाच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भास्कर बेंगाळ, अभिषेक बेंगाळ, सानप एस.एस, सरकटे, कसाब यांची उपस्थिती होती.
कै.रं.रा.वि. नूतन साहित्य मंदिर वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
हिंगोली : येथील कै. रंभाबाई रामचंद्र बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात मंगळवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा.जी.पी. मुपकलवार कर्मचारी संतोष ससे, रामेश्वर गांजवे, संतोष सामाले, लक्ष्मण मावळे, लक्ष्मण लाड यांची उपस्थिती होती.
अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय पुसेगाव
पुसेगाव : येथील अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डी.ए. सिरामे, प्रा.जे.व्ही. देशमुख, व्ही.जे. जोशी, डी.एन.मुंढे, एन.ए.शिंदे, एस.डब्लू. येडेकर, यू.एस. होडबे, एस.ए.नाईक, ए, खिल्लारे, ए.धाबे कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.