येथील भीमनगरात झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मोतीराम वाढवे याच्या प्लॉटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगाऱ्यांकडून रोख २ हजार ४५० रुपयांच्या रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोना गणेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून शेख फारुख शेख शब्बीर (रा. नाईकवाडी मोहल्ला), शहेबाज बेग इबादुला बेग (रा. भीमनगर), कमलेश ठाकूर (रा. साईनगर), सईन नाईक (रा. कळमनुरी), सद्दाम कुरेशी, समीर हबीबभाई प्यारेवाले (सर्व रा. कळमनुरी), सल्ला बेग (रानुरी मोहल्ला), चालक ढब्या मोतीराम वाढवे (रा. भीमनगर) याच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोउपनि जाधव करीत आहेत.
शेनोडी येथील चार जुगाऱ्यांवर कारवाई
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथे पोलिसांनी २९ जुलै रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगाऱ्यांकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाइलसह एकूण १० हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोह रोहिदास राठोड यांच्या फिर्यादीवरून नारायण मारुती गुव्हाडे, रामचंद्र मुंजाजी भिसे, संतोष विठ्ठल पाईकराव, विठ्ठल गोविंदा पाईकराव यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह राठोड करीत आहेत.