वाई शिवारात जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:29+5:302021-07-03T04:19:29+5:30

वसमत तालुक्यातील वाई शिवारात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ३३ केव्हीच्या पाठीमागील ...

Raid on a gambling den in Wai Shivara | वाई शिवारात जुगार अड्ड्यावर छापा

वाई शिवारात जुगार अड्ड्यावर छापा

वसमत तालुक्यातील वाई शिवारात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ३३ केव्हीच्या पाठीमागील गायरान शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी चार जण ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १ हजार १२० रुपये व ६ हजारांचा मोबाइल, तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले.

या प्रकरणी सपोउपनि आनंदा तुकाराम शेळके यांच्या फिर्यादीवरून सय्यद गौस सय्यद चाँद, बालाजी पंढरी कदम (दोघे रा. शिरडशहापूर), दीपक शावजी खंदारे, संदीप कदम (दोघे रा. वाई) यांच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Raid on a gambling den in Wai Shivara