सेनगाव येथे जुगारअड्ड्यावर छापा; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:38+5:302021-06-19T04:20:38+5:30

सेनगाव : तितली भवरा, मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगाऱ्यांकडून ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ...

Raid on gambling den at Sengaon; 36 thousand items confiscated | सेनगाव येथे जुगारअड्ड्यावर छापा; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव येथे जुगारअड्ड्यावर छापा; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव : तितली भवरा, मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगाऱ्यांकडून ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सेनगाव शहरात करण्यात आली असून, तिघांना ताब्यात घेतले आहे.

सेनगाव शहरातील एका बंद असलेल्या पेट्रोलपंपाच्या बाजूला मोकळ्या जागेत काहीजण तितली भवरा, मटका जुगार खेळत असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून १८ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक माकणे, पोशि शिंदे, मेनकुदळे आदी कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी येथे तितली भवरा, मटका जुगार सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच काहीजणांनी तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यावेळी गजानन विठ्ठल बिडकर (रा. सेनगाव) याच्या ताब्यातून रोख रक्कम व काळ्या रंगाच्या लॅपटॉपसह ३२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल, विष्णू सखाराम खरात (रा. कोळसा) याच्या ताब्यातून २ हजार ७२० रुपये रोख, शिवाजी कडूती गिते (रा. नागासिनगी) याच्या ताब्यातून ९४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य असा असा एकूण ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Raid on gambling den at Sengaon; 36 thousand items confiscated