पानकन्हेरगाव येथे पत्त्यावर पैसे लावून काही जण हार-जीतचा खेळ खेळत असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक अभय दीनानाथराव माकणे यांच्या पथकाने पानकन्हेरगाव येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पत्त्यावर पैसे लावून चार जण हार-जीतचा खेळ खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ३२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्या फिर्यादीवरून संदीप सुभाष बांगर, अनिल रामभाऊ झुंगरे, प्रवीण विश्वनाथ जाधव, मंगेश सुरेश बांगर (सर्व रा. पानकन्हेरगाव) यांच्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह. शेषराव माघाडे करीत आहेत.