शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीत चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 19:37 IST

गोळीबार झाल्याची चर्चाही शहरात होत आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेस पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर २३ नोव्हेंबर रोजी शहरात दोन गटांत हाणामारी झाली. यात तीन ते चारजण जखमी झाले असून, गोळीबार झाल्याची चर्चाही शहरात होत आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेस पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. शिंदे सेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याची चर्चा असून, घटनेचे नेमके कारणही अद्याप पुढे आले नाही.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी- एकीकडे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होती. दुपारच्या सुमारास निकाल हाती येत होते. त्याच वेळी शहरात दोन गटात वाद झाला. या वादानंतर धारदार शस्त्राने हाणामारीही झाली. यात चार ते पाचजण जखमी झाले आहेत. हाणामारीनंतर शहरात गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. येथे जखमींवर प्राथमिक उपचार करून नांदेडला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर यांनी हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. यावेळी हॉस्पीटलच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. शिंदे सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची शहरात चर्चा होती.

गोळीबार झाल्याचीही चर्चाहाणामारीच्या घटनेनंतर गोळीबार झाल्याची शहरात चर्चा आहे. जखमी झालेले गोळीबारात जखमी झाले की, धारदार शस्त्राने याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले, घटनेतील जखमीला नांदेड येथे हलविले आहे. तेथील डॉक्टरांशी संपर्कात आहोत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेबाबत त्यांनी कोणतीही पुष्टी दिली नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी