शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST2021-02-23T04:45:57+5:302021-02-23T04:45:57+5:30

हिंगोली : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव व फैलाव होऊ नये यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात ...

Punitive action against those who roam the city without masks | शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही

शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही

हिंगोली : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव व फैलाव होऊ नये यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, २० व २१ फेब्रुवारी रोजी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून ६ हजार ८०० रुपये दंडात्मक स्वरूपात वसूल केले. दोन दिवसांमध्ये ३१ जणांवर कारवाई करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने २० फेब्रुवारीपासून शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, शहरातील प्रत्येक झोन तसेच प्रभागात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

३१ जानेवारीअखेर शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होती; परंतु, फेब्रुवारी महिन्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. हे पाहून नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. पी. शिंदे, बी. के. राठोड, ठाकूर, बाळू बांगर, अमर ठाकूर, पंडित मस्के, नागेश नरवाडे हे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवत विनामास्क फिरू नये, सॅनिटायझरचा वापर करावा. नसता दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, अशा सूचना मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी दिल्या आहेत.

फाेटाे नं. १५

Web Title: Punitive action against those who roam the city without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.