महा-वॉकथॉनद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:00 IST2018-11-19T00:00:12+5:302018-11-19T00:00:24+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी महा-वॉकथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महा-वॉकथॉनद्वारे जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोलीत : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी महा-वॉकथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अपघातातील या दुर्घटनेत मृतांचा आकडा दरवर्षी फुगतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता सुरक्षाविषयक बाबींची माहिती व्हावी, वानहचालकांनी रस्ता नियमांचे पालन करावे यासाठी विविध प्रकारे जनजागृती या महा-वॉकथॉन म्हणजेच पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या विविध घोषवाक्यांची फलक शहरात लावण्यात आली होती. हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी डीवायएसपी सुजाता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, उपकार्यकारी अभियंता जगताप, सुदेश कंदकुर्तीकर, गोपाल पातूरकर, शिरूरे, धाडवे, केदारी, मते यांच्यासह जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चालकांना आवाहन
४रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून महा-वॉकथॉन पदयात्रा काढून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाहनचालकांनी रस्ते व वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.