शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'वसमतमधील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्या'; आमदार नवघरेंची अजित पवारांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:52 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली

- इस्माईल जाहागिरदारवसमत: गुरुवारी शहरात २२५ मिमि पाऊस झाला. सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन गुरुद्वारा परिसरातील प्राचिन गाव तलाव फुटून शेकडो घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करत आ. राजू नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.

२७ जुलै रोजी शहरात ढगफुटी होऊन शहरातील गाव तलाव फुटून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात आ. नवघरे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. २७ जुलै रोजी वसमत तालुक्यात झालेल्या ढगफुटीबद्दल व गाव तलाव फुटुन नुकसान झाल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. नुकसानग्रस्त झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा...आ. राजू नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत वसमत शहरात झालेल्या अतिवृष्टी व प्राचिन गाव तलाव फुटल्याची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोली