शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, टोमॅटोसह भाजीपाला रस्त्यावर फेकत निषेध; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 11:35 IST

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव या चार मंडळाला अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे

- दिलीप कावरखेगोरेगाव ( जि.हिंगोली) : येथे अतिवृष्टी अनुदानासह विविध मागण्यासाठी गत आठवडा भरापासून शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असताना तालुका भरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. २३ सप्टेंबर रोजी संतप्त शेतकऱ्यांकडून कांदे, बटाटे, टमाटे आदी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत सरकारविरुध्द निषेध नोंदवण्यात आला. 

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव या चार मंडळाला अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे . अतिवृष्टी अनुदानासह विविध मागण्यासाठी १६ सप्टेंबर पासून शेतकऱ्यांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. मागण्यावर ठाम राहत तालुक्याभरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे . शेतकरी आक्रमक होत आंदोलन काला तीव्र वळण लागत असल्याचे चित्र आहे. संतप्त आंदोलक शेतकऱ्यांकडूण संपाच्या आठव्या दिवशी गोरेगाव येथील मा जिजाऊ चौफुली रस्त्यावर कांदे , टमाटे ,बटाटे , कोबी , वांगे आदी भाजीपाला रस्यावर फेकत मुख्यमंत्री , कृषिमंत्री व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला . 

आंदोलक शेतकऱ्यांना घेतले ताब्यात....संपकरी शेतकऱ्यांकडून पोलीस ठाण्यात निवेदन देत २३ सप्टेबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय राज्य मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला असताना हिंगोलीकडे रवाना होण्याच्या तय्यारीत असलेल्या नामदेव पतंगे , गजानन कावरखे , गजानन सावके या शेतकरी आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील , पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव , सपोनी सुनील गोपींवार  आदींसह चौफुली मुख्य रस्त्यावर पोलिसांचा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती