शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक 

By विजय पाटील | Updated: December 8, 2023 16:09 IST

शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे. 

हिंगोली: बँक कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीस काढूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. ८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे. 

दोन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. असे असताना सरकारच्या अस्मानी-सुलतानी धोरणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र खरीप हंगामापासून पहावयास  मिळत आहे. यंदा खरीप हंगामात प्रचंड उत्पन्न घटीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यात पिकविमा परतावा किंवा कुठलीच शासकीय मदत अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करुन शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे शेतीतून लावलागवडीचा खर्चही वसूल झाला नसताना डोक्यावर झालेल्या बँक कर्जाचा बोजा उतरवायचा कसा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

अशा परिस्थितीत गोरेगावसह परिसरातील दहा शेतकऱ्यांकडून आमची किडनी, डोळे, लिव्हर आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून याबाबत दखल घेण्यात आली नाही. आता संबंधित शेतकऱ्यांनी परत मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली असून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी येथील मुख्य रस्त्यावर दूध सांडून देत सरकारच्या दुर्लक्षित धोरणाबाबत घोषणा दिल्या. यावेळी  निषेध आंदोलनही करण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीagitationआंदोलन