शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

टंचाईतील प्रस्ताव गेले विभागीय आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:40 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या आता दीडशेवर गेली आहे. टँकरही १८ च्या पुढे सरकले आहेत. मात्र इतर उपाययोजनांचे प्रस्ताव पडताळणी व इतर बाबींमुळे अजूनही मंजुरीच्या टप्प्यात नाहीत. निवडणुकीच्या कामांमुळे अधिकाऱ्यांना यात पडताळणीसाठी वेळ मिळाला नाही. या दरम्यान आचारसंहिता लागली अन् त्यानंतर पडताळणीचे अहवालही आले. जवळपास २१ कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेली आहेत. यात पूरक योजना, नळयोजना दुरुस्ती आदी कामांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. टंचाईसाठी आचारसंहिता शिथिल असल्याचे सांगितले जाते. मात्र तरीही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचा हिरवा कंदिल मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.पूर्वी अशा कामांसाठी गुत्तेदारांची लॉबी सक्रिय असायची. मात्र आता खरोखरच जनता टंचाईत होरपळत आहे.प्रशासनाने केलेल्या पडताळणीतही बºयाच ठिकाणी हे समोर आले आहे. किरकोळ कारणांनी या योजना बंद असल्याने शासनाची कोट्यवधींची इतर यंत्रणा मात्र वाया गेल्यात गणती राहात आहे.वेळेत कामे व्हावीतटंचाईतील कामांना आचारसंहितेचा अडसर नसेल तर पुढील पंधरा दिवसांत याबाबतची सगळी प्रक्रिया पूर्ण करून ही कामे केली तर हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाºया ग्रामस्थांना फायदा होईल. त्यासाठी कडक सूचना देण्यासह दिरंगाईत कारवाई करावी लागणार आहे.टंचाईतील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दरवर्षीच विलंब होतो. त्यामुळे ही कामे करण्यासाठी यंत्रणा जवळपास मे महिन्यात प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुढे नजीकच्या काळात पावसाळा लागणार असल्याने ही कामे करणारी गुत्तेदार मंडळीही विविध कारणे सांगून वेळ मारून नेते. त्यामुळे पुढे पावसाळ्यात टंचाई संपते अन् या मंडळींना योजनेबाबत कोणी विचारतच नाही. त्यामुळे टंचाईतील खर्च नाहक वाया जातो. काही तुरळक ठिकाणीच ही कामे वेळेत करून टंचाईत नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम केले जाते.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग